नेपाळमध्ये मोठा राडा! रस्ते रक्ताने लाल, संसदेत धुमाकूळ, 14 जण ठार, नेमकं काय घडतंय?

नवी दिल्ली : सध्या नेपाळमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. याठिकाणी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुणांत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे संपूर्ण देशात वातावरण तापले आहे.

येथील संतापलेले तरुण थेट संसदेवर चालून गेले आहेत. काही तरुणांनी तर थेट संसदेत जाऊन तोडफोड केली आहे. या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचेही समोर आले आहे. यात आतापर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 जखमी झाले आहेत. अजूनही परिस्थिती हातात आली नसून सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.
नेपाळमधील काठमांडूमधील रस्ते आता रक्ताने लाल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी नेपाळमधील सुरक्षा दलांनी गोळीबार केला आहे. तसेच पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. सरकारने 26 सोशल मीडियावर बंदी घातली आहे.

नेपाळमधील भ्रष्टाचाराबाबत तरुणांत मोठा राग निर्माण झाला आहे. हजारो तरुण थेट संसदेवर चालून गेले. काही तरुण थेट संसदेत घुसले. संसदेत जाऊन तरुणांनी तोडफोड केली. संसद परिसरात काही ठिकाणी जाळपोळ केल्याचेही समोर आले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.
सध्या प्रत्येक तरुण सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुण आज व्यक्त होतात. अशातच नेपाळमध्ये तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याने तिथल्या तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे याचा निषेध व्यक्त केला जात आहे.