रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात मोठा खुलासा; दीपक केसरकर यांची चौकशी होणार?

मुंबई : पवईमध्ये ऑडिशनला बोलावून सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या सर्व प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली तर आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या अखेरीस रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेऊन मोठा कट रचला होता. त्याची मनधरणी करण्याचा आणि मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला आणि रोहितशी बोलण्याची विनंती केली. पण केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये रोहित ठार झाला. आता या प्रकरणात मोठी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे.
दरम्यान. गुन्हे शाखेकडून एपीआय अमोल वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदण्यात आले आहे. रोहित आर्या हा काही माथेफिरू अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगार नव्हता. मग पोलिसांनी त्याला का मारले असा सवाल करत हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे. पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

दरम्यान रोहित आर्याने याआधी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यावेळी केसरकरांना फोन लागला नाही की बोलण्यास नकार दिला? हे समोर आले नाही. या दोन विरोधाभासी माहितीमुळे पोलिस संभ्रमात असल्याचे कळते. त्यासाठी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.