रेव्ह पार्टीमधील महिलांबद्दल मोठा खुलासा, एकनाथ खडसेंच्या जावयासोबत काय संबंध? वेगळीच माहिती आली समोर…


पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्टीत काही पुरूषांसोबतच महिलांचा देखील समावेश होता. पार्टीतून गांजा, कोकेन आणि दारू पोलिसांनी जप्त केली. रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी ही छापेमारी केली. मात्र, यानंतर सतत पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली जात आहेत.

पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचेही खडसेंनी म्हटले. आता नुकताच पुणे रेव्ह पार्टीबद्दल अत्यंत मोठी अपडेट ही पुढे येताना दिसतंय. पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली, त्यावेळी पार्टीच्या ठिकाणाहून तीन महिला पळून गेल्याचे सांगितले जात होते.

पण त्या तीन महिलांचा पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिस तपासात पुढे आलंय. न्यायालयात खेवलकरांची पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी हेच कारण देत म्हटले होते की, संशयित तीन महिलांचा शोध घ्यायचा आहे.

पार्टीमध्ये आणखी तीन महिलांचा समावेश होता. मात्र, पोलीस येताच त्या महिला तिथून निघून गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पण पोलिस तपासात या महिलांचा या पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आज खेवलकरांना कोर्टात हजर केले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!