शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली ३ दिवसांची मुदत वाढ…
मुंबई : आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. असे असताना ती आता ३ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात काही भागात अतिशय कमी पाऊस झाला असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतक-यांना सहभागी होण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी शेतकरी करत होते. सध्या शेतीची कामे सुरू आहेत.
शेती कामात शेतकरी प्रचंड व्यस्त आहे. या सोबतच राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आहे, सव्र्हर सतत डाऊन राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून पीक विमा भरण्यासाठी जावे लागते.
त्यामुळी ही मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी संबंधित बँक किंवा http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता