शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यातील तब्बल ‘एवढ्या’ शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर
पुणे : सध्या शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. यासाठी त्यांना मदत करून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
शेतकऱ्यांनी शेती मशागतीचा खर्च वाढल्याने सरकारच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी केली आहे.
यासाठी राज्यातील तब्बल 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने 2023-24 मध्ये राज्यातील फक्त 25 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.
शेतीकामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केल्यामुळे पुढील काही काळात बैल जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने राज्यातील १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहेत. यामध्ये अनेकांचा समावेश आहे.
शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते. उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात.
धक्कादायक! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर, पुण्यातील घटना
खताबरोबरच आता शेती मशागतीचा खर्च महागला आहे. भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.
आता गौतमी पाटीलसाठी खासदार अमोल कोल्हे मैदानात, म्हणाले, दोन वेळचे जेवण
तसेच ट्रॅक्टरला शेतीसाठी लागणारी अनेक प्रकारची यंत्रे जोडता येतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सोयीस्कर पडतो. तसेच शेतीच्या कामासाठी मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ट्रॅक्टर उत्तम उपाय आहे. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.