ग्राहकांना मोठा दिलासा ; लग्नसराईत सोनं स्वस्त, २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले,


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वारंवार चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोन्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घट झाली आहे.दिवाळी आणि तुळशी विवाह झाल्यानंतर लगेचच लग्नसराईला सुरूवात होते. लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीला जास्त महत्त्व असताना आता सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज १४ नोव्हेंबर २०२५. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२७,८५० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,७८,५०० रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१७,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७००० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,७२,००० रूपये मोजावे लागतील.२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९५,८९० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,८०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,५८,९०० रूपये मोजावे लागतील.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!