रेल्वेत लवकरच मोठी भरती! तरुणांनो लागा तयारीला, पगारही जास्त…

पुणे : तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्तीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे.

राज्यात अखेर पावसाला सुरुवात, ‘या’ भागात आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्टही जारी…
काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या ओव्हर टाइमचा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत वेगवेगान हालचाली सुरू केल्या आहेत.

मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, गुन्हे शाखेची कारवाई..
भारतीय रेल्वेमध्ये एकूण ३.१२ लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. रेल्वेकडून रिक्त पदांची अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. डिसेंबर २०२२ मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये एकूण ३.१२ लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत.
वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने? पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर
यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागात एकूण १४,८१५ आणि वाहतूक परिवहन विभागात ६२,२६५ पदे रिक्त आहेत. त्यांच्या उत्तरानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त जागा होत्या. ज्यात देशभरात ८७,६५४ रिक्त जागा होत्या. त्यानंतर यांत्रिक विभागात ६४,३४६आणि इलेक्ट्रिकल विभागात ३८,०९६ रिक्त जागा होत्या.
सिंहगड रोडवर धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या, पुण्यात गुन्हेगारी वाढली..
ओडिसातील बहनगा स्टेशन अंतर्गत १७, ८११ अराजपत्रित पदे रिक्त ओडिसातील बालासोर येथे २ जूनला ज्या बहनगा बाजार स्टेशन येथे अपघात झाला होता त्याठिकाणी ३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राजपत्रित नसलेल्या पदांसाठी १७,८११ आणि १५० रिक्त राजपत्रित पदे आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली होती.
एक लाखाहून अधिक पदे भरण्याची अपेक्षा
रेल्वेने २०१९ मध्ये एक मेगा भरती मोहीम सुरू केली होती आणि सध्या निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व झोनना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी “विशेष मोहीम” सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे.