भारतीय रेल्वेत मोठी भरती! एकूण ३२,४३८ जागांची भरती होणार, पगार एका लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप…

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने ग्रुप-डी भरतीची घोषणा केली असून त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

ज्यामध्ये एकूण ३२,४३८ पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार २३ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची तपशीलवार माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
या भरतीमध्ये, विविध विभागांमध्ये रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये वाहतूक, अभियांत्रिकी, यांत्रिकी, S&T आणि इलेक्ट्रिकल विभागांमध्ये पदे जाहीर करण्यात आली आहेत.

यापैकी वाहतूक विभागात पॉइंट्समन-बीची ५०५८पदे आहेत, तर इंजिनीअरिंग विभागात ट्रॅक मशीन असिस्टंटची ७९९ पदे आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड ४ ची १३,१८७ पदे रिक्त आहेत. याशिवाय सहाय्यक सेतूची ३०१ पदे, यांत्रिकी विभागात सहाय्यक (C&W) २५८७ पदे, सहाय्यक लोको शेड (डिझेल) ४२० पदे आणि सहाय्यक (कार्यशाळा) ३०७७ पदे भरण्यात येणार आहेत.
इलेक्ट्रिकल विभागात, सहाय्यक TRD च्या १३८१ पदे, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) च्या ९५० पदे आणि इतर विविध पदांवर देखील नियुक्त्या केल्या जातील. या भरतीमध्ये एकूण ३२,४३८ पदांवर भरती केली जाणार आहे.
पात्रता किती?
ग्रुप डी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्यांनी NCVT कडून राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असावे. या वयोमर्यादेत RRB नियमांनुसार विविध श्रेणीतील उमेदवारांनाही सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, त्यापैकी ४०० रुपये संगणक आधारित परीक्षा (CBT) मध्ये बसल्यावर परत केले जातील. त्याच वेळी, SC, ST, EBC, महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना फक्त २५० रुपये शुल्क भरावे लागेल, जे परीक्षेत उपस्थित राहिल्यास ते पूर्णपणे परत केले जाईल.
परीक्षेचे स्वरूप कसे असणार?
RRB गट-डी भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT-1), शारीरिक कार्यक्षमता चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. CBT मध्ये चार प्रमुख विभाग असतील.
सामान्य विज्ञान: २५ प्रश्न
गणित:२५ प्रश्न
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क: 30 प्रश्न
सामान्य जागरूकता : २० प्रश्न
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील, तर बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिले जातील.
अधिसूचना जाहीर करण्याची तारीख: २८डिसेंबर २०२४
अर्ज सुरू होण्याची तारीख: २३ जानेवारी २०२५
अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख: २२ फेब्रुवारी २०२५