पुण्यातील मोठ्या पोलीस स्टेशनचे लवकरच होणार विभाजन, वाचा ‘त्या’ पोलिस स्टेशनची यादी..
पुणे : सध्या पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये सध्या 33 पोलिस स्टेशन कार्यान्वीत आहेत. असे असताना वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी 7 नवीन पोलिस स्टेशन लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहेत.
यामुळे सध्याच्या ठिकाणचा ताण कमी होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ, हडपसर पोलिस स्टेशन, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे विभाजन होणार आहे.
लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..
नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वीत केली जाणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून नांदेड सिटी पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून आंबेगाव पोलिस स्टेशन होणार आहे.
तसेच हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे विभाजन करून फुरसुंगी पोलिस स्टेशन आणि काळेपडळ पोलिस स्टेशन, लोणीकंद पोलिस स्टेशनचे विभाजन करून वाघोली पोलिस स्टेशन, चंदननगरच्या हद्दीचे विभाजन करून खराडी पोलिस स्टेशन आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून बाणेर पोलिस स्टेशन होणार आहे.