मोठी बातमी! खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या भोवतीचा फास आवळणार? चौकशीसाठी टाळाटाळ करणं महागात…

पुणे : नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह त्यांना सह आरोपी करण्याची मागणी आता केली जात आहे. नुकताच या प्रकरणी एसआयटी कडून त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र रूपाली चाकणकर चौकशीसाठी टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन उघड झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेगाला आहे. खरात प्रकरणात एसआयटी कडून रूपाली चाकणकर यांच्यासह 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आली. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा पाठवण्यात आली.मात्र या नोटीसला रूपाली चाकणकर यांनी तब्येतीचे कारण देत जाण्यास टाळले होते. रूपाली चाकणकर या कारवाईच्या भीतीने चाैकशीला जात नसल्याचे सांगितले जात आहे.
मात्र रूपाली चाकणकर यांचा जबाव आज नोंदवला जाणार आहे. यापूर्वी चाकणकर यांच्याकडून तब्येतीचे कारण देत चाैकशीला जाण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. आज चाकणकर चौकशीला हजर राहणार आहेत. हवाला रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे. दुबईत मोठी रक्कम पोहोचवल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्याभोवतीचा फास आणखीन आवळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रूपाली चाकणकर यांना याच प्रकरणामुळे द्यावा लागला. या प्रकरणात चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे.