मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांच्या विधानाने खळबळ..


पुणे : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार कंबर कसली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही, असे सांगत त्यांनी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी यांनी लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केले. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 सालानंतर 2022 साली निवडणुका होणे गरजेचे होते. मात्र नंतरची 2022, 2023, 2024 साल गेलं. आता 2025 हे वर्षही संपायची वेळ आली आहे. या निवडणुका लांबण्यामागे काय कारणं आहेत याच्या खोलात मी जात नाही, असे भाष्य अजित पवार यांनी केले. तसेच सर्व घटकांना प्रतिनिधित्त्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता अजित पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत लांबल्या तर काय होईल? यात कोणकोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!