मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? गुन्हा झाला दाखल, नेमकं कारण काय?


मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. याबाबत अजून रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत पोलिसांना मोठ्या आवाजात बोलल्याचे विडिओ व्हायरल झाले होते. याबाबत अनेकांनी कारवाईची मागणी केली होती.

मरीन ड्राईन पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. यामध्ये रोहित पवार हे पोलिसांना हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, असं म्हणत पोलिसांवरच भडकले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याचे पडसाद अधिवेशात उमटले होते. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती.

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी मोठा राडा झाला होता.

या अटकेनंतर, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघे आमदार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या अटकेची चौकशी करण्यासाठी पोहोचले होते. तिथे रोहित पवार यांची एका पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. पण अधिकऱ्यानी अटक केकेले लोकं कुठे आहेत, इतर कोणाला अटक का केली नाही याबाबत माहिती दिली नसल्याचे सांगितल्याने गोंधळ झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!