मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? गुप्त बैठकीचे फोटो समोर, लवकरच…

पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याला जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. याच युतीवर चर्चा करण्यासाठी संभाजीनगरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाली आहे. शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन आणि अजित पवार गटाचे अभिजित देशमुख यांनी एकत्र येत युतीसंदर्भात चर्चा केली आहे. बैठकीचे काही फोटोही बाहेर आले आहेत.
महापालिका निवडणुकीत एमआयएमला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले पाहिजे असे अजितदादा गटाचे अभिजित देशमुख यांना वाटते. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी चांगल्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे मत शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी गट निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय गोटात तशा हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या गुप्त बैठकांचे काही फोटोदेखील समोर आले आहेत.छत्रपती संभाजीनगरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेमकी काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

