मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा शपथविधी तात्काळ का घ्यावा लागतोय? समोर आल मोठं कारण…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत.सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा इतक्या घाईने का केला जात आहे? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं असताना खरं कारण समोर आल आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक गट फुटून जाऊ नये, म्हणून हा सुनेत्रा पवार यांचा तत्काळ शपथविधीचा घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीपासून अजित गटातील एक गट फुटण्याच्या स्थितीत होता. अजित पवारांच्या जाण्याने पक्षफुटीची हालचाल आणखी तीव्र होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा शपथविधी तातडीने घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.


अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.या शपथविधीच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहावं, असा पार्थ पवारांचा आग्रह आहे. मात्र उद्या त्या दिल्लीला जाणार आहेत.
मागील सव्वा एक तासांपासून पार्थ पवार गोविंदबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्याला विरोध आहे. त्यांनी विलीनीकरणासंदर्भात यू टर्न घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे तात्काळ सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.
या शपथविधीच्या काही तास आधीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. आपल्याला सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत काहीच माहीत नाही. आपण चर्चेचा भाग नव्हतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षांतर्गत हा निर्णय घेतला असेल, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
