मोठी बातमी! पुण्यात आतापर्यंत किती टक्के मतदान?’ या’ भागात सर्वाधिक मतदान

पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये आज 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.मात्र पुणे जिल्ह्यातील 12 नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमध्ये मतदानाची सुरुवात संथ गतीने झाली, पहिल्या चार तासांत फक्त 20.22% मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळमध्ये सर्वाधिक 28.33% मतदान झालं, तर दौंड नगर परिषदेत सर्वात कमी 13.21%.मतदान झाले आहे.
कोणत्या मतदार संघात किती मतदान झालं?
दौंड – 13.21

लोणावळा – 22.23

चाकण – 23.60
शिरूर – 13.23
इंदापूर -24.95
जेजुरी-21.03
आळंदी – 24.54
राजगुरुनगर- 17.24
सासवड – 24.30
तळेगाव दाभाडे-16.28
जुन्नर-17.59
भोर – 21.75
वडगाव मावळ-28.33
मालेगाव बुद्रुक – 24.12
मंचर – 27.83
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील लढाईच्या रूपात रंगल्या आहेत. राज्यात सध्या महायुतीची सत्ता आहे. ज्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे.तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षांचा देखील समावेश आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीसह अनेक इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बहु टप्प्यातील निवडणुका घेतल्या जात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा सुरु झाला, ज्यामध्ये नगरपरिषदा आणि नगर पंचायतींचा समावेश आहे.
