मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा, नेमकं कारण काय?


नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

याबाबत माहिती अशी की, धनखड यांना दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत ते म्हणाले, मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. माझ्या कार्यकाळात आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो.

असेही ते म्हणाले. दरम्यान, अचानक जगदीप धनखड यांना राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असेही धनखड म्हणाले. आता नवीन नियुक्ती कोणाची होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!