मोठी बातमी! वाल्मिक कराडला जेलमध्ये अटॅक, प्रकृती गंभीर, डॉक्टरांकडून तपासणी सुरू…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. वाल्मिक कराड याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती. त्याला पॅनिक अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. सीआयडीकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा मुक्काम पुढचे अनेक दिवस जेलमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्याला जेलमध्ये मारहाणही झाल्याची माहिती होती. वाल्मिक कराड याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं.
त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. कराडला देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे.
दरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने जेल प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार केला जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हत्या प्रकरणात कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. कराडच्या वकिलांनी मधल्या काळात जामिनासाठी देखील अर्ज केला होता. पण त्याला दिलासा मिळाला नाही. कराड हा या प्रकरणात सीआयडीला शरण गेला आहे. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे.