मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राची तब्येत बिघडली ; तीन दिवसापासून मुंबईत उपचार सुरू..

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ सुपुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी तेजस ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडली होती त्यानंतर त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे थांबले असून ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.तसेच लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत तेजस ठाकरे?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तेजस ठाकरे हे कनिष्ठ सुपुत्र आहेत. त्यांची मुख्य ओळख वन्यजीव संशोधक म्हणून आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 5 नवीन प्रजाती शोधून काढल्यात्यापैकी एकाला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले. पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या काही प्रजातीशोधून काढल्या,सप्टेंबर 2019 मध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली
दरम्यान नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत तेजस ठाकरे यांनी प्रचारातही आपला सहभाग नोंदवला. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शाखाभेटी कार्यक्रमात तेजस ठाकरे आघाडीवर होते. राजकीय दृष्ट्या ही ते सक्रिय आहेत.