मोठी बातमी! निलेश घायवळच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ ; पुणे पोलिसांनी थेट आई-वडिलांना बजावली नोटीस


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट मोठा डाव टाकला आहे. पोलिसांनी घायवळ याच्या आई-वडिलांना नोटीस पाठवली आहे. पुणे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी निलेश घायवळ याला हजर करावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, जर निलेश घायवळ याला चौकशीसाठी हजर केले नाही, तर त्याच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई केली जाईल का? असा सवाल आहे. ही नोटीस 2 दिवसांपूर्वी घायवळच्या आई-वडिलांना पाठवण्यात आली आहे. निलेश घायवळ हा फरार असलेला आरोपी असून, त्याच्याविरुद्धच्या गुन्हे आणि तपासाच्या अनुषंगाने त्याला पोलीस चौकशीसाठी हजर करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता युके मध्ये देखील घायवळच्या मुसक्या आवळल्याची तयारी होत आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामुळे त्याला तातडीने चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर करणं बंधनकारक आहे, असंही पुणे पोलिसांनी बजावलं आहे. त्यामुळे आता निलेश घायवळ याचा पाय खोलात गेला आहे.

       

दरम्यान, माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत, असं निलेश घायवळची आई म्हणाल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!