मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता VV-PAT मशीन असणार नाही…

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहेत. तसेत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अजून निश्चित नाही.
याबाबत माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, असे देखील संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे यामुळे येणाऱ्या काळात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आयुक्त म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाकडून ज्या निवडणुका होतात त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही. यामध्ये एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ती पद्धत अधिकाधिक वेळकाढू होते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.