मोठी बातमी! वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये पुन्हा एकदा गोंधळ, पोलिसही हादरले, नेमकं काय घडलं?

बीड : सध्या बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. याबाबत सध्या तपास सुरू आहे. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्हाच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे.

वाल्मिक कराडला या तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप अनेकदा केला जात आहे.याठिकाणी तुरुंगात गँगवार झाल्याची घटना समोर आली होती. असे असताना अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाल्मिक कराडसह बीडमधील काही कुख्यात गुंड बीडच्या तुरुंगात आहेत.
जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या रफीक खुर्शीद सय्यद या आरोपीकडून मोबाईल हस्तगत झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस यंत्रणा नेमकं करतेय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच कारागृहात दुसऱ्या एका कैद्याजवळ गांजाचे पुडे सापडले होते. या सलग घडणाऱ्या घटना कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. यामुळे याठिकाणी अनेक सोयी सुविधा मिळतात हा प्रश्न खऱ्या अर्थाने खरा ठरला आहे. यामुळे याबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
दरम्यान, रफीक हा अटक होऊन जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ मध्ये न्यायालयीन कोठडीत होता. काल त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कारागृहातील पोलिस गोविंद भालेराव व रामअप्पा परळकर यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल आढळला.