मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भातील ‘ती ‘याचिका न्यायालयाने फेटाळली


पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत निवडणुकांमध्ये चक्राणूक्रमे आरक्षण लागू करण्याच्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या धोरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भविष्यातील निवडणुकांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिनिधित्वासाठी चक्राणूक्रमे आरक्षणाची पद्धत लागू करावी, ज्यामुळे प्रत्येक निवडणूक वेळी विविध प्रभागांमध्ये या समुदायांचे समभाग सुनिश्चित करता येईल. अशी याचिकां याचिका कर्त्याने दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.ही याचिका नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र त्यात चक्राणूक्रमे आरक्षण पद्धतीला मान्यता दिलेली नव्हती. या निर्णयाच्या विरोधात याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केल्यानंतर याचिका फेटाळली असून नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

कोर्टाच्या निर्णयानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण त्यांच्याच लोकसंख्येच्या प्रमाणातच राहणार आहे आणि चक्राणूक्रमे आरक्षण लागू केले जाणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!