मोठी बातमी! आंदेकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात ; कुटुंबाविरोधात दुसरा गुन्हा दाखल,जुगार अड्ड्यावरही पोलिसांचा छापा, बँक अकाउंटही सील…


पुणे : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या संपूर्ण परिवाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली आंदेकरसह १२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकरच्या हत्ये प्रकरणी आरोपी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी गुरूवारी पोलिस गेले होते. त्यावेळी पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा करून सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यास विरोध करणाऱ्या १२ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्वजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार दाखल करत थेट सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा सोनाली आंदेकर आणि तिच्या इतर सहकाऱ्यांविरोधात दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

दरम्यान पोलिसांनी बंडू आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरूवारी पुणे पोलिसांनी आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.या प्रकरणी सात जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सहकुटुंबाच्या बँक अकाउंट सील करून आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्यामुळे आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!