मोठी बातमी! महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी, 20 जणांचा मृत्यू, अमृत स्नान रद्द, मोदींकडून घटनेचा आढावा…

प्रयागराज : प्रयागराज इथं सध्या महाकुंभ मेळा सुरू असून येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घडली. मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली.

नंतर इथं भयंकर चेंगराचेंगरी होत एकच गोंधळ माजला. इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल होत यंत्रणांनीही इथं धाव घेतली.
यामुळे शाही स्नान देखील रद्द करण्यात आले आहे. आज 13 आखाड्यांचे शाही स्नान आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला.

यामुळे येणाऱ्या काळात हा कुंभ मेळा सुरू राहणार की बंद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशविदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविकांनी प्रयागराज गाठलेलं आहे.
दरम्यान, चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती, की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या याठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली असून बचावकार्य सुरू आहे.