मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिक्षा कीं दिलासा मिळणार?

पुणे:राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकाचा लाभ घेतल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालय कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवणार की त्यांना दिलासा देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला होता. कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले.

दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा सुनावली आणि त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने देखील शिक्षा कायम ठेवली आहे.त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेला सांगितली होती मात्र शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आल आहे. आता सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
