मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला ; इतके कोटी वळवले?

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची पडताळणी, त्यातील गैरप्रकार अशा अनेक घटना समोर आल्याने ही योजना वादात सापडली होती.याच लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410 कोटींचा निधि वळवण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसून , त्याच पैशांची सर्व लाडक्या बहीणी वाट पहात आहेत. दरम्यान याच सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींच्या निधीवर डल्ला मारण्यात आला असून ते पैसे आता लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहेत. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी वापरण्यात यावा यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला. त्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागाअंतर्गत 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.