मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं; ‘या ‘ठिकाणी होणार आता..


पुणे : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांसाठी दसरा मेळावा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकरी पावसामुळे आणि पुरामुळे अडचणीत असून त्यासाठी शिवसेनेकडून निधी संकलित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे भव्य होणार नसून यात केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिवसैनिक हजर राहणार असल्याचही त्यांनी सांगितलं.दरम्यान शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत. हे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभ राहणार आहे, आज कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे, त्यामुळे सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुढच्या काही दिवसात संपूर्ण पिकांचे आकडे येतील. दोन-तीन दिवसात संपूर्ण माहिती आल्यानंतर आम्ही चर्चा करुन शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना मदत करताना अटी,शर्थी,नियम बाजूला ठेवून मदत केली जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!