मोठी बातमी! शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ ; 60 कोटींच्या घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई..

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिल्पा आणि तिच्या पती विरोधात 60 कोटींची फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध उद्योगपती दिपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुमारे एक दशकापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून 60 कोटी रुपये घेतले होते. या जोडप्याने त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन दिले होते आणि याच कामासाठी दोन हप्त्यांमध्ये 60 कोटींचे पेमेंट केले गेले होते. कोठारी यांनी आरोप केला की, पैसे घेतल्यानंतर या दोघांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही आणि सर्व पैसे त्यांनी वैयक्तिक वापरासाठी खर्च केले.
दरम्यान या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती यांना लुक आउट नोटीस जारी केली आहे.
