मोठी बातमी!निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे कट्टर समर्थक साथ सोडणार ; अजित पवारांचा हात धरणार?

पुणे : विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यापासून शरद पवार गटाला चांगलीच गळती लागली आहे. अनेक नेते -पदाधिकारी त्यांची साथ सोडून सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राहुल मोटे यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
राहुल मोठे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. 2004,2009 आणि 2014 असे सलग तीन वेळा त्यांनी परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. मात्र 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मोठे आणि शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र 2024 च्या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर त्यांनी आता त्यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान मोटे यांच्या पक्ष बदलामुळे परंड्याच्या राजकारणात एक वेगळ समीकरण तयार झाल आहे. परंड्याचे विद्यमान आमदार तानाजी सावंत हे शिंदे गटात आहेत, त्यांच्यासोबत राहुल मोटे यांचे राजकीय वैर आहे. आता मोटे सुद्धा महायुतीचा भाग होणार असल्याने दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एका छताखाली कसे नांदणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.