मोठी बातमी! संजय राऊतांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड, कार्यकर्त्यांनी लिहिलेले भावनिक पत्र

पुणे : खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडत असतात. कोणत्याही अडचणीच्या काळात संजय राऊत हे पक्षासाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढाल म्हणून उभे राहिलेले असतात. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. राऊत यांनी स्वतः पत्राद्वारे ही माहिती आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना दिली आहे.

शिवसेना पक्षाची फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनीच एक्स या समाजमाध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण शध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे राऊत यांनी सांगितले आहे.

तसेच कार्यकर्त्यांना दिलास देत त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नव्या वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू देत.तसेच, वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दी मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

     
   
 
				
