मोठी बातमी! 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचं आरक्षण अखेर जाहीर, ठाण्यात महिला तर पुणे सर्वसाधारण…

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना आता ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल आहे.त्यामुळे आगामी काळात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आल आहे.. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे. कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांसह आता निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केली आहे.आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे. आता आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.