मोठी बातमी! राज ठाकरेंनी टाकला मतदार घोटाळा बॉम्ब, ठाण्यात 2 लाख, मुंबई उत्तर-पूर्व, पुण्यात 1 लाख मतदारांचा घोळ…

मुंबई : मतदार याद्यामधील घोळ,निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत विरोधी पक्षानी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार घोटाळ्याचा बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे.राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025 च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली. निवडणूक आयोग पुरावे मागतो असं सांगत त्यांनी पुराव्याचा गठ्ठाच समोर आणला आहे.

कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?

मुंबई उत्तर – 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)

मुंबई उत्तर पश्चिम – 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)
मुंबई उत्तर पूर्व – 92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)
मुंबई उत्तर मध्य – 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)
मुंबई दक्षिण मध्य – 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)
मुंबई दक्षिण – 55,205 दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)
नाशिक – 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)
मावळ – 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)
पुणे – 1,02,002 दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)
ठाणे – 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)
दरम्यान लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभारून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असताना निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
