मोठी बातमी! राजधानी दिल्लीत राहुल गांधी अन उद्धव ठाकरेंच्यात तब्बल 35 मिनिटे चर्चा ; कारण काय?


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच्यां निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा राजधानी दिल्लीत होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी काल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची सहकुटुंब भेट घेतली.या भेटीत दोन्ही नेत्यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिटे बैठक झाली. दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी ही स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी पण उपस्थित होत्या.

दिल्लीत महाराष्ट्रातील राजकारणाविषयी हालचाली वाढल्या आहेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात 35 मिनिटांच्या झालेल्या चर्चेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यां पक्षासोबत आघाडीची वार्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीविषयी महाविकास आघाडीचे ही धोरण समोर आलेले नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान काल राहुल गांधी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाली. यावेळी आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्षांचा त्यात समावेश होता. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारण मोठा भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!