मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्या कारणाने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या छातीत कफ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाखल केल्यानंतर त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या मात्र शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता.. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही तासांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
