मोठी बातमी! पुण्यात आंदेकर टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई ; फरार कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांसमोर हजर..

पुणे : पुण्यातील नाना पेठेमध्ये गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह इतर 13 जणांना अटक केली गेली आहे. या आंदेकर टोळीवर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेश पेठेतील नागझरी नाल्याजवळ मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महापालिकेने तीन मजली इमारत उभारली आहे. मात्र इमारत बांधल्यानंतर नाल्यातच बेकायदा मासे विक्री सुरू होती. या ठिकाणी आंदेकर टोळी विक्रेत्यांकडून दरमहा हप्ता वसूल करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी बंदोबस्तात कारवाई करून नाल्यातील मासे विक्रेत्याविरुद्धही कारवाई केली आहे.

दरम्यान आंदेकर टोळीने यापूर्वीही एका मासे विक्रेत्याला हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण करून खंडणी मागितली होती. याप्रकरणी बंडू आंदेकरचा पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांच्यासह काही साथीदारांना पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर सर्व विक्रेतांना महापालिकेने उभारलेल्या नव्या मासळी बाजारात स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान आयुष कोमकर यांच्या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह 13 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा फरार होता. मात्र अखेर तो पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला आहे. कृष्णा आंदेकर हजर होण्यामागे एक मोठी माहिती समोर आली आहे.आयुष कोमकर प्रकरणातील तपास अधिकारी असलेल्या शैलेश संखे यांनी त्याला फोन करून एन्काऊंटर करू असं म्हटलं होतं. त्यानंतर फरार असलेला कृष्णा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. त्याला पुढे शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर त्याच्याकडे मोबाईल संचाची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी मोबाईल संच फोडून टाकले याची माहिती समोर आली. दरम्यान या सर्व घडामोडीमुळे आंदेकर टोळीवर पोलिसांचा घेरा आणखी घट्ट झाला असून पुढील तपासात आणखी नवे पुरावे व आरोपी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.