मोठी बातमी! पक्षाची धडक अन नागपूरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग ; नेमकं काय घडल?


पुणे: एका पक्षाने दिलेल्या धडकेमुळे नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे.. वैमानिकाने नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. घटनेच्या वेळी विमानात 272 प्रवासी सवार होते. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरहून कोलकत्ताला जाणाऱ्या विमानाला हवेत एका पक्ष्याने धडक दिली. त्यामुळे विमानाचा पुढील भाग खराब झाला. वैमानिकाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अपघात टळला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. विमानाला पक्षी धडकल्यानंतर ते डगमगू लागले. त्यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला. सर्व लोक घाबरले आणि गोंधळ सुरु झाला. लोकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. वैमानिकाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून तात्काळ सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

दरम्यान आता वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रुही यांचे विमानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर निवेदन समोर आले आहे.
ते म्हणाले, “इंडिगोच्या नागपूर-कोलकाता उड्डाण क्रमांक 6E812 ला पक्षी धडकल्याची शक्यता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!