मोठी बातमी! लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच गिफ्ट, 2100 नाहीतर थेट 4500 मिळणार

पुणे :सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे.महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती.

दरम्यान आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या महापालिकेच्या निवडणुका निकालानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण निवडणुकीनंतर सरकारकडून एकत्रित तिन्ही महिन्यांचा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
