मोठी बातमी! हवेली तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीची होणार नव्याने सोडत; तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडून सोडत कार्यक्रम जाहीर…..

उरुळी कांचन : सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षण कोटयात २७ टक्के इतकी वाढ झाल्याने हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची नव्याने सोडत (दि.११) रोजी उदयान प्रसाद कार्यालय १७१२/१ बीसीव्ही जोशी रोड, खजिना विहीर चौक, माडेवाले कॉलनी सदाशिव पेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार राज्यात
ओबीसी २६.०४ कोट्यानुसार आरक्षणे काढण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २७ टक्के ओबीसी आरक्षणात वाढ झाल्याने २०१५ ते २०३० कालावधीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
त्यानुसार हवेली तालुक्यात आगळंबे, निरगुडी, वडगाव शिंदे,फुलगाव , कल्याण या पाच ग्रामपंचायत वगळून तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार आहेत. हवेली तालुक्यात यापूर्वी २३एप्रिल रोजी ६६ ग्रामपंचायतीच्या

आरक्षणांची सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार अणुसुचित जाती /जमाती -स्त्री पुरुषासाठी ९ , भटक्या जाती / जमाती प्रवर्ग स्त्री -पुरुषासाठी २ तर ओबीसी स्त्री -पुरुष प्रवर्गासाठी १९ तर सर्वसाधारण प्रवर्गात स्त्री – पुरुष मिळून ३६ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गात जागा वाढून आरक्षण सोडत नव्याने राबविण्यात येणार आहे.