Big News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना बसणार मोठा धक्का, राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवले जाणार?
Big News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. चिन्ह गोठल्यास शरद पवार आणि अजित पवार गटाला नविन पर्यायी चिन्हांचा शोध घ्यावा लागणार आहे. Big News :
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला. पक्ष कुणाचा हा वाद कोर्टात पोहचला यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने नविन चिन्हांचे पर्याय शोधले. अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी पक्षात पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून नव्या चिन्हांची चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नवे चिन्हे काय असावे, याबाबत अजित पवार गटाची कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे समजत आहे. Big News तर, दुसरीकडे शरद पवार गटही सुनावणीसाठी तयार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढं राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपलेच आहे, असा दावा अजित पवार गटाकडून केला आहे. शिवाय आपल्यालाच जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, असाही दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या दोन्ही गटांकडून आमदार अपात्र करा, अशी मागणी सतत केली जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग येत्या ६ ऑक्टोबर रोजी कोणता निर्णय घेणार? याकडे दोन्ही गटासह राज्याचे लक्ष लागले आहे.