मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पुणे महापालिका निवडणुकांना ब्रेक! मार्चनंतरच धुरळा उडणार? मोठी अपडेट समोर

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुका ह्या सुप्रीम कोर्टाची डेडलाईन ओलांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका केवळ स्थानिक स्वरूपाच्या न राहता ‘मिनी विधानसभा निवडणुका’ ठरणार आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. मात्र, महानगरपालिकांच्या निवडणुका मात्र मार्च २०२६ नंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेली ३१ जानेवारी २०२५ ची मुदत ओलांडली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा हा थेट मार्चनंतर उडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान नागपूर येथे ८ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरत आहे. अधिवेशन काळात महापालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणे प्रथेनुसार टाळले जाते. त्यामुळे १९ डिसेंबरनंतरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा पुढचा टप्पा सुरू होईल. त्यानंतर जानेवारीत या निवडणुका पूर्ण होतील, आणि त्याचे निकालही जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
