मोठी बातमी!! आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू…

अहिल्यानगर : भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकी गाडीने दुचाकी गाडीला धडक दिली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यामध्ये नितीन शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत माहिती अशी की, सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाची मागून धडक ही नितीन शेळके यांच्या दुचाकीला बसली. हा भीषण अपघात होता. अहिल्यानगर पुणे महामार्गावर ही घटना घडली आहे. याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेत दुचाकीचे आणि सागर धस यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातानंतर ही गाडी ठाण्यात आणली आहे. याबाबत तपास सुरू आहे. सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. यावेळी ही घटना घडली आहे. सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. रस्त्याने जात असताना सागर धस यांच्या गाडीने शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर नितीन शेळके यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. ही गाडी आमदार सुरेश धस यांचा मुलगाच चालवत होता की, अजून कोणी याबद्दल माहिती मिळू शकली नाही. याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, सागर धसच गाडी चालवत असल्याची एक चर्चा आहे. सध्या आमदार सुरेश धस यांचा मुलगा नेमका कुठे आहे, याबाबतही अजून काही माहिती ही पुढे मिळू शकली नाही. सध्या याबाबत तपास सुरू आहे. घटनेचा तपास सध्या सुरू आहे.