मोठी बातमी! दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अनेक घडामोडी घडल्या. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. असे असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितले आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपलं नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आलं आहे. द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी याचिका केल्याचा दावाही ठाकरेंनी केला.
मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात म्हटले आहे की, सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तसेच राजकीय नेत्यांनी ही बाब लावून धरली होती. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही.