मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडला झटका, कोर्टाने थेट..

बीड :बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात,अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला कोर्टाने मोठा झटका दिला आहे.नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा जामीन फेटाळण्यात आला आहे.
मास्टर माईंड वाल्मिक कराडचा खंडणी त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे केलेले अपहरण आणि हत्या यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईल वरील संभाषण, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संवाद, जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांच्या सत्यतेची पुष्टी, प्रयोग शाळेतील अहवाल या पुराच्यांच्या आधारे सहभाग असल्याचे दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आला आहे. बीडच्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. बीड बिहार झाल्याचेही आरोप यादरम्यान करण्यात आले. दरम्यान यामध्ये दिलेल्या निकालात वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे.

