मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; पुढचे पंधरा दिवस….

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. अखेर काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच जरांगे यांनी उपोषण सोडलं.त्यानंतर लगेचच पुढील उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पंधरा दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक झाली आहे. आता डॉक्टरांनी त्यांना पुढील पंधरा दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईहून परतल्यानंतर रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची संपूर्ण तपासणी केली आहे. दीर्घकाळ उपवास केल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर, रक्तदाब तपासण्यात आले. त्यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या तपासण्याही करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले आहे. त्यांना पुढचे पंधरा दिवस पूर्णपणे आराम करण्यास सांगितल आहे.

अखेर मराठ्यांच्या लढ्याला यश आलं.यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

