मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित, केली मोठी घोषणा…

जालना : मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरा-समोर लढायची तयारी ठेवायची, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे.

मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणीसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावणी मागण्यात आलेला आहे. त्यानंतरही काही नाही झालं तर मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांची भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. यावेळी चर्चा केली.
यावेळी धस यांनी जरांगे पाटील यांच्या काही मुद्यावर चर्चा केली. शिंदे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी धस यांच्यापुढे मांडली. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
