मोठी बातमी! महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध ; अजित पवारांना पुन्हा अध्यक्षपदाची..


मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूकींकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना मतदानाच्या पूर्वसंध्येलाच अध्यक्ष पदाचा तिढा सुटला आहे. अध्यक्षपदासाठीची ही निवडणूक बिनविरोध होणार असून, अजित पवार पुन्हा एकदा असोसिएशनचे अध्यक्ष बनणार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीची चर्चा अधिक रंगली होती. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षपद दोन-दोन वर्षांसाठी वाटून घेतले जाणार आहे.

दरम्यान या करारांतर्गत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील ५ जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत, तर ७ जागा मोहोळ गटाला मिळाल्या आहेत. महासचिव आणि खजिनदार ही दोन्ही महत्त्वाची पदे मोहोळ गटाकडे असतील. तसेच, उपाध्यक्ष पदाच्या ४ जागांपैकी २ जागा मोहोळ गटाला आणि २ जागा अजित पवार गटाला मिळतील. सहसचिव पदाच्या ४ जागांपैकी देखील २ जागा मोहोळ गटाला आणि २ जागा अजित पवार गटाकडे जाणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा निर्णय दोन्ही गटांनी एकत्रितपणे घेतला आहे. संध्याकाळी मुंबईमध्ये होणाऱ्या जनरल बॉडीमध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!