मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख..


पुणे : राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढी संबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला.निवडणूक आयोगाने केलेल्या या मागणीवर न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे.

आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यासाठी अखेरची तारीख सांगितली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत या निवडणुका घ्या असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पार पडणार आहेत.

याआधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यासह इतर कारणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.. मात्र आता कोर्टाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुढील 4 महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,जिल्हा परिषद अशा निवडणुका एकाच वेळी घेणे निवडणूक आयोगाला शक्य नसल्याने या निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!