Big News! ईडीच्या रडारवर आता किशोरी पेडणेकर, ईडीकडून गुन्हा दाखल, अडचणीत वाढ…

Big News मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
महपालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्याभरापूर्वी ईडीने पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती.
या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.