मोठी बातमी! मनोज जरांगे हत्या कट प्रकरणात करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट,1 कोटींची डील अन…..


पुणे : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. धनंजय मुंडे आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. त्यावर धनजंय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आता या प्रकरणात करुणा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.जरांगे पाटील यांच्यावरील हल्ल्याचा कट धनंजय मुंडे यांनीच केला असणार. धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या बायकोला सोडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते मला त्रास देत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची आतील टीम फोडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केली आहे. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला आहे. त्यावेळी धनंजय मुंडेनीं त्याला पाच लाख रुपये पाठवले होते. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची १ कोटीची डील सुरु होती,असा गंभीर दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, जेव्हा मी जरांगेकडे गेली होती. त्याने मला मेसेज केला तेव्हा मी जरांगेकडे होते. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी मनोज जरांगेंकडे गेली आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड यांचे मोबाईल तपासा. व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. मेसेज आहेत. धनंजय मुंडे यांनी त्याला सॉरी म्हणून मेसेज केला होता. ते खूप गरीब व्यक्ती आहेत. धनंजय मुंडेंनी त्याला पाच लाख रुपये त्याला पाठवले होते. एका गरीब माणसाला धनंजय मुंडे सॉरी का बोलतोय. पाच लाख कशासाठी दिले. हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची १ कोटीची डील सुरु होती, असा गंभीर दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

हे सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि माझी देखील नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे सारखी नासकी वृत्ती आम्हाला संपवायची आहे. धनंजय मुंडेंना मराठवाड्यातून नव्हे, तर देशातून बाहेर काढून अमेरिकेला पाठवावे आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. या सगळ्या संघर्षामुळे आत्महत्या करण्याची वेळ आपल्यावर आली असून मी एकटी पडली आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!