राजकारणातील मोठी बातमी!! उद्धव-राज यांची गुप्त भेट, सगळं ठरलं? राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यावर मनसेकडून देखील भाष्य करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोठी अपडेट समोर आली आहे. उद्धव आणि राज यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू हे लवकरच युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

       

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते युतीबाबत प्रचंड सकारात्मक आहेत. तर, दुसरीकडे मनसेकडून आमचे दोन वेळेस हात पोळले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने प्रस्ताव पाठवावा अशी भूमिका घेतली आहे.

ठाकरे गट आणि मनसेमध्ये पहले आप पहले आपचा खेळ सुरू असताना दुसरीकडे राज्यातील जनतेचे ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागले. आता शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!